क्रिडा यशोगाथा(आमचा मान,आमचा अभिमान )
टेकवाडे येथील आर.सी.पटेल प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याचे" क्रिडा महोत्सवात सुवर्ण वेध". टेकवाडे येथील आर.सी.पटेल प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शिरपूर येथे नुकत्याच झालेल्या मम्मीजी क्रीडा महोत्सवात सुवर्ण वेध साधत घवघवीत यश संपादन केले. शिरपूर येथील आर.सी.पटेल मेन ब्लिडींग येथे हेंमतबेन आर पटेल उर्फ मम्मीजी यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या तालूका स्तरीय क्रीडा स्पर्धेत 2 गटातील 12 स्पर्धेत शाळेतील 42 विद्यार्थ्यानी सहभागी होवून 4 मेडल मिळवले . यात 1)गोणपाट शर्यत -कोळी दुर्गेश हिम्मत,(प्रथम )बागूल मनिषा गोरख (द्वितीय )2) रिंग टाकणे-पावरा दुर्गेश नारु(प्रथम).3)बादलीत चेंडू टाकणे- धनगर हरिष धनराज(तृतीय) यांनी क्रमांक मिळविले .या सर्व विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी पी.झेड. रणदिवे, संस्थेचे विश्वस्त कमलकिशोरजी भंडारी, शिक्षण विस्तार अधिकारी नीता सोनवणे ,संस्थेचे सी.ई.ओ.उमेश शर्मा ,प्राचार्य एस. बी.पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या विद्यार्थ्याना शाळेचे मुख्याध्यापक बी.आर.महाजन,किशोर सोनवणे , रुपेश कुलकर्णी ,दिपक महाजन,जितेंद्र करंके सुंनदा सोनार , भाईदास पावरा, अभिजीत ईशी यांचे मार्गदर्शन लाभले .
No comments:
Post a Comment